वृत्तसंस्था/ पुणे
2023 च्या प्रो-कबड्डी लिग हंगामातील येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळविण्यात आलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सला 49-19 अशा गुणफरकाने पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेतील पुणेरी पलटनचा हा पहिल विजय आहे.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटनचा पराभव केला होता. शनिवारच्या सामन्यात पुणेरी पलटनच्या कबड्डीपटूंनी आपल्या अचूक चढायावर गुण वसूल केले. पुणेरी पलटनच्या मनिंदरने आपल्या पहिल्या चढाईवर 3 गुण वसूल केले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सवर 20-12 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद झाले. पुणेरी पलटनतर्फे मनिंदरसिंगचा खेळ दर्जेदार झाला.









