वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरचे नवे मुख्य सचिव म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी पुनीत कुमार गोयल यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रशांत कुमार सिंग यांची जागा घेतील. गोयल हे एजीएमयूटी कॅडरचे 1991 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सचिव पदावर यापूर्वी कार्यरत असलेले प्रशांत कुमार सिंग यांची आता राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी जानेवारी 2025 मध्ये मणिपूरचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. डॉ. गोयल हे यापूर्वी गोव्याचे मुख्य सचिव होते. त्यांना केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रशासकीय अनुभवाचा त्यांना मोठा अनुभव आहे.









