Shivshahi Bus Fire : पुणे नाशिक मार्गावर सिन्नर जवळ पुन्हा एक शिवशाही बस आगीत भस्मसात झाली.सुदैवाने कोणतीही जिवीतहाणी झाली नाही.सकाळी ८ च्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात जवळ आली असता ही घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवशाही बस पेटण्याच्या घटना या वाढत चालल्या आहेत. मंगळवारी यवतमाळ पुणे शिवशाही बस ही शस्त्री नगर चौकात पेटली. या घटनेत ४२ प्रवाशी ही थोडक्यात बचावले. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा सिन्नर जवळ बस पेटण्याची घटना घडली आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- लव जिहाद वरून जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा ठिय्या
नेमके काय घडले
राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने आज सकाळी जात होती. ही बस सकाळी ८ च्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात जवळ आली असता ही घटना घडली. ही बाब चलकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने ही बस रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि प्रवाशांना खाली उतरवले.दरम्यान,काही वेळातच संपूर्ण बस पेटली.या बस मध्ये ३० प्रवासी होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Previous Articleभारत आणि बांगलादेश क्रिकेट सामना रंगणार ॲडलेडवर
Next Article जाणून घ्या तुळशीचे आरोग्यदायी फायदे








