ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई दुतगती महामार्गावरील दोन्ही बाजुंना प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच महामार्गावरील लेन वाढविण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एका संकेतस्थळाला दिली आहे.
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दुतगती मार्गावर सातत्याने अपघात आणि वाहतूक कोंडी होत असते. 2002 मध्ये या महामार्गाची उभारणी करण्यात आली होती. अलिकडच्या काळात या महामार्गावरुन धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. परिणामी अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होती होती. एमएसआरडीसीने ही बाब गांभीर्याने घेत या महामार्गावर दोन्ही बाजुंना प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महामार्गावरील दोन्ही बाजुंच्या लेन वाढविण्यासाठी अतिरिक्त जागेचे संपादन करावे लागणार आहे. महामार्गावर नवे 10 बोगदे नियोजित आहेत. एकूण कामासाठी पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.








