ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मागील दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी रात्री खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. पहाटे अडीचपर्यंत दरड हटविण्यात आली. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या. तर एक लेन अजूनही बंद आहे. ही लेन सुरळीत सुरू करण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.








