पुणे/ प्रतिनिधी
पुणे जिह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करताना 65 व्या वरि÷ गट गादी व माती राज्य अजिंक्मयपद कुस्ती स्पर्धेच्या 86 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
कोथरूड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिह्याच्या प्रतीक जगतापने सोलापूरच्या एकनाथ बेंदेला 8-3 असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱया उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने सातारा जिह्याच्या विजय डोईफोडेला 5-1 असे करताना अंतिम फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीत साताऱयाच्या विजय डोईफोडेने पुणे शहरच्या ओंकार दगडेवर 13-2 अशी मात करताना उपांत्य फेरी गाठली. पुणे जिह्याच्या प्रतीक जगतापने कल्याणच्या सोमनाथ भोईरवर 7-0 अशी मात केली. उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने ठाणे शहरच्या विशाल महातेकरला मात देताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या एकनाथ बेंदेने कोल्हापूर जिह्याच्या किरण पाटीलला 11-0 असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली.
तत्पूर्वी, स्पर्धेच्या दुसऱया दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या 86 किलो वजनी गटात नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. याच गटात सोलापूर जिह्याच्या राहुल काळेने संभाजीनगरच्या (औरंगाबाद) मोईन शेखला चितपट केले. भंडारा जिह्याच्या अर्जुन काळेने मुंबई शहरच्या दिनेश पवारला 10-3, मुंबई पश्चिमच्या रोहित मोढळेने पुणे जिह्याच्या संतोष पडळकरवर 15-5 अशी मात करताना पुढील फेरी गाठली. नाशिक जिह्याच्या नितीन बेझेकरने रायगडच्या सचिन भोपीला 7-4 असे गुणांच्या साहाय्याने पराभूत केले. वाशीमच्या सचिन पाटीलने बीडच्या अनिकेत गोरेवारवर 4-1 अशी मात करताना स्पर्धेच्या पुढच्या फेरीत धडक दिली.









