ऑनलाईन टीम/तरुण भारत
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी (D S Kulkarni) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी (Hemanti Kulkarni) यांना त्यांच्यावर २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमधे पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डीएसके आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे.
डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंतीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, मात्र खरेदीदारकाला फ्लॅटचा ताबा दिला गेला नव्हता. या प्रकरणी कुलकर्णींना २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी २०१८ पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. परंतु आता पुणे न्यायालयाचे न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी त्यांचा जामीन अखेर मंजुर केला आहे.
वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यासह त्यांचे कनिष्ठ अॅड. रितेश येवलेकर यांनी १३ ऑगस्ट २०१६ रोजी सिंहगड पोलीस स्टेशन, पुणे येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये श्री. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी श्रीमती हेमंती दीपक कुलकर्णी यांची बाजू मांडली. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना देण्यात ते जाणूनबुजून अयशस्वी ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
हे ही वाचा : राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, डीएसके यांच्या विरोधात ४५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. डीएसके आणि त्यांच्या पत्नी प्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली मात्र त्यांना प्लॅटचा ताबा न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, यानंतर ५ मार्च २०१९ रोजी डीएसके कुलकर्णींसह त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली, १७ फेब्रुवारी २०१८ पासून ते तुरुंगात आहेत.
मात्र या गुन्हातून कुलकर्णी दाम्पत्याला जामीन मिळावा यासाठी डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि अॅड. रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. दरम्यान मुख्य गुन्ह्यातून जामीन मिळावा यासाठी देखील डीएसके यांनी अर्ज केला होता, हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर आता 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.