पुलाची शिरोली, वार्ताहर
Kolhapur Accident News : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरहून शिरोलीच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकला भरधाव डंपरची पाठीमागून जोराची धडक बसली.यामुळे संतोष मलगोंडा पाटील रा.जनवाड ता. चिक्कोडी हा मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला.हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शिरोली जवळ पटेल हाँल समोर घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिक्कोडी तालुक्यातील जनवाड येथील संतोष मलगोंडा पाटील हे कामानिमित्त मोटरसायकल वरून कामानिमित्त कोल्हापुरात आले होते.काम आटोपून ते शिरोलीकडे निघाले होते.सकाळी साडेदहाच्या दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली गावच्या हद्दीतील शबनम हाँटेल समोर आले असता तावडे हॉटेलहुन शिरोलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टाटा डंपरची पाठीमागून मोटर सायकलला जोराची धडक बसली. यामध्ये संतोष पाटील हे उडून रस्त्यावर आपटले यावेळी हा डंपर त्याच्या अंगावरून गेल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला.









