पुणे / प्रतिनिधी :
पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे. पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून, त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर होणार आहे.








