बेळगाव : मंडोळी रोड चौगुलेवाडी बेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ अभियानाला बेळगावचे नूतन उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते चालना देण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजश्री पाटील यांनी पल्स पोलिओ संबंधाची माहिती दिली. शून्य ते पाच वर्षा पर्यंतच्या सर्व मुलांना दोन थेंब पोलिओ लसीकरण करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या वतीने 20 पोलिओ बुथच्या सहाय्याने केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या अंदाजे 2800 बालकांना पोलिओ डोस आज पाजण्यात आले.
Previous Articleजिल्ह्यात बारा गावांना टँकरने पाणीपुरवठा
Next Article ‘गॅरंटीं’च्या लाभार्थ्यांचा भाजपकडून सातत्याने अपमान









