केंद्राकडून जारी मानांकन ः लक्षद्वीपची भरीव कामगिरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद सरकारने मंगळवारी सामाजिक प्रगती निर्देशांक (सोशल प्रोग्रेस इंडेक्स) जारी केला आहे. या निर्देशांकात पुड्डुचेरी, लक्षद्वीप आणि गोवा यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. तर ऐझोल (मिझोरम), सोलन (हिमाचल) आणि शिमला हे सर्वोत्तम जिल्हे ठरले आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने इन्स्टीटय़ूट ऑफ कॉम्पटीटिव्हनेस अँड सोशल प्रोगेस इम्परेटिव्हसोबत मिळून ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
राज्ये तसेच जिल्हय़ांचे मानांकन 12 निकषांच्या आधारावर निश्चित करण्यात आले आहे. या निकषांमध्ये लोकांच्या मूलभूत गरजा आणि शक्यतांचा विशेष विचार करण्यात आला आहे. याचबरोबर पोषण, मूलभूत आरोग्य सेवा, पाणी, साफसफाई, सुरक्षा, राहणीमान, पर्यावरणाची स्थिती आणि आधुनिक शिक्षण उपलब्धता इत्यादी निकष विचारात घेण्यात आले आहेत.
या निर्देशांकासाठी सर्व राज्ये आणि जिल्हय़ांना 6 शेणींमध्ये विभागण्यात येते. सामाजिक प्रगती निर्देशांकात पुड्डुचेरीला 65.99 गुण मिळाले तर याप्रकरणी सर्वात कमी गुण बिहार आणि झारखंडला प्राप्त झाले आहेत. ईएसी-पीएमचे अध्यक्ष विवेक देवरॉय यांनी हा अहवाल जारी केला आहे.
दीर्घावधीत निरंतर आर्थिक विकासासाठी सामाजिक प्रगती आवश्यक आहे. हा निर्देशांक आर्थिक विकास आणि विकासाच्या पारंपरिक उपायांना पूरक असल्याचे म्हटले गेले आहे. उच्च दर्जाची सामाजिक प्रगती (पुड्डुचेरी ते केरळ), उच्च दर्जाची सामजिक प्रगती (जम्मू-काश्मीर ते अंदमान निकोबार बेट), उच्च मध्यम सामाजिक प्रगती (उत्तराखंड ते मणिपूर) कनिष्ठ मध्यम सामाजिक प्रगती (हरियाणा ते राजस्थान), अल्प सामाजिक प्रगती (उत्तरप्रदेश ते मध्यप्रदेश), अत्यंत कमी सामाजिक प्रगती (आसाम ते झारखंड) अशा शेणी निर्धारित करण्यात आल्या होत्या.
कुणाला किती गुण?
पुड्डुचेरी 65.99
गोवा 65.53
सिक्कीम 65.10
मिझोरम 64.19
तामिळनाडू 63.33
हिमाचल प्रदेश 63.28
चंदीगड 62.37
केरळ 62.05
जम्मू-काश्मीर 60.76
पंजाब 60.23
लडाख 59.53
अंदमान-निकोबार 58.76
उत्तराखंड 58.26
कर्नाटक 56.77
अरुणाचल 56.56
दिल्ली 56.28
हरियाणा 54.15
गुजरात 53.81
आंध्रप्रदेश 53.60
पश्चिम बंगाल 53.13
तेलंगणा 52.11
महाराष्ट्र 50.86
राजस्थान 50.69









