सावंतवाडी / प्रतिनिधी
Publication of this collection of long stories of healing humanity!
उपचार माणुसकीचा या दीर्घकथा संग्रहाचे प्रकाशन काल करण्यात आले . वास्तवाचे भान ठेवून सामाजिक क्षेत्रात आपल्या प्रत्येकाच्या समोर घडत असलेल्या घटना यावर आधारित लिखाण या कथासंग्रहामध्ये केलेले आहे . तसेच सामाजिक भान राखले गेले आहे. आणि यातून माणुसकीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे .त्यामुळे दीर्घ कथासंग्रह असलेले पुस्तक वाचनीय आहे . माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीराम टोपले यांनी हे पुस्तक लिखाण करून आपल्यामधील लेखक जागृत केला आहे. अशा शब्दात त्यांच्या दीर्घ कथासंग्रह पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सावंतवाडी येथील केशवसुत कट्टा येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव गरड येथील सहयोग ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक मोतीराम टोपले यांनी लिहलेल्या उपचार माणुसकीचा या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲड संतोष सावंत , लेखक मोतीराम टोपले ,सहयोग ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गोडकर, कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे ,तालुका खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर,ॲड अरुणपणदूरकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, सुभाष गोवेकर, दीपक पटेकर ,मंगल नाईक, संतोष पवार, सुहासिनी सडेकर, दत्ताराम सडेकर ,तारिका टोपले ,प्रदीप पियोळकर, विकास गोवेक,र ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा देसाई ,अरुण मेस्त्री ,दिलीप भाई मुकुंद वझे ,राजेंद्र बिजे ,विलास पंडित सोमनाथ जीगजींनी ,बाळासाहेब नंदीहळी, सौ कासार ,प्रदीप ढोरे, शंकर प्रभू, प्रसाद टोपले ,सौ टोपले, आदी उपस्थित होते .