वार्ताहर/सांबरा
बसवण कुडची येथे सोमवार दि. 24 पासून श्री बसवाण्णा, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. मंगळवार दि. 25 रोजी ‘तरुण भारत’च्यावतीने काढण्यात आलेल्या यात्रा विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. येथे दरवर्षी इंगळ्यांची मोठी यात्रा भरते. यंदा प्रथमच ‘तरुण भारत’च्यावतीने यात्रेचा विशेष अंक काढण्यात आला. यात्रा विशेष अंकामध्ये मंदिरसह गावची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. येथील श्री बसवाण्णा-कलमेश्वर मंदिरसमोर यात्रा विशेषांकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी नगरसेवक बसवराज मोदगेकर, माजी नगरसेवक बसवंत हलगेकर, समाजसेवक परशराम बेडका, संभाजी गिरी, तुकाराम जैनोजी, देवाप्पा कडेमनी, अजित पाटील, तानाजी चौगुले, आप्पाण्णा मुतगेकर, गोपाळ पाटील, अन्वर मुल्ला, प्रकाश अनगोळकर, जयपाल पाटील, धनपाल पाटील, सुनील गिरी, किरण बेडका, कल्लाप्पा मुतगी, कल्लाप्पा जैनोजींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









