सुप्रसिद्ध लेखक डॉ. अशोक भाईडकर यांची कादंबरी
वेंगुर्ला –
अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, लोकनाट्य संशोधक व विधीज्ञ ,डॉ. अशोक भाईडकर यांच्या “स्पर्श “या नव्या कादंबरीचे प्रकाशन नुकतेच किरातच्या संपादिका सीमा मराठी यांच्या हस्ते वेंगुर्ले नगरीत संपन्न झाले.”स्पर्श “ही डॉ. अशोक भाईडकर यांची तिसरी कादंबरी असून यापूर्वी त्यांची “आवस” व्हर्जन (इंग्रजी )प्रसिद्ध झाली होती. आवस या कांदबरीतुन आपल्या जडण घडणीत आईचे योगदान आणि गरिबीचे चटके खात अनुभवलेले भावविश्व अंगावर काटा आणणारे आहे.तर स्पर्श ह्या कादंबरीमध्ये त्यांनी शृंगारिक विषयाला हात घातलेला असून तो आजच्या तरुणाईला भुरळ आणि मोह घालणारा विषय आहे.महाविद्यालयीन विद्यार्थी असल्यापासून अनेक नाटके, लिहिणारे भाईडकर यांची जवळपास सहा पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यांची काही पुस्तके ही इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.
डिंपल प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सवी उत्सवात त्यांच्या “लीडर ” ही चौथी कादंबरी लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर आहे.स्पर्श कांदबरी प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावर प्रा.सुधाकर वळजू डॉ.अशोक भाईडकर किरात संपादिका सीमा मराठे ,ॲड.शशांक मराठे व ज्येष्ठ रांगोळीकार श्री रमेश नरसुले आदी मान्यवर उपस्थित होते. भाईडकर यांच्या साहित्यिक योगदानबद्दल अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून या योगदानबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.









