वाळपई /प्रतिनिधी
येणाऱया काळात पुरण शेती याचा इतिहास सत्तरी तालुक्मयातील नवीन पिढीला करून द्यायचा असेल तर प्रकाश पर्येकर यांनी लिहिलेली पुरण ही कादंबरी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी केले आहे.
गोवा विश्वविद्यालयाच्या कोकणी विभागाचे प्रमुख प्रकाश पर्येकर यांनी या कादंबरीचे लिखाण केले आहे. या संदर्भाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी पणजी येथील मिनिझीस ब्रागांझा सभागृहात संपन्न झाला .व्यासपीठावर रमिता गुरव ,प्रा.भुषण भावे, दिलीप बोरकर दौलत हवालदार व कादंबरीचे लेखक प्रकाश पर्येकर यांची खास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भूषण भावे यांनी सांगितले की सत्तरीमध्ये चालणाऱया पुरण प्रकारची माहिती दिली. बदलत्या काळानुसार बदलत गेलेली शेती प्रथा आधुनिकीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली निसर्गाची हानी ग्रामीण भागातील शेतकऱयांकडे झालेले दुर्लक्ष व सर्व कारणांमुळे नष्ट होत चाललेली कृषी परंपरा या संदर्भात त्यांनी खंत व्यक्त केली.
गेले अनेक वर्षे पुरण शेतीसाठी आपले जीवन समर्पित करणारे पांडुरंग गावकर व पार्वती गावकर या शेतकऱयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रमिता गुरव यांनी पुस्तकावर आपले परीक्षण मांडले.
यावेळी बोलताना दिलीप बोरकर व दौलत हवालदार यांनी सांगितले की ग्रामीण भागातील कृषी संस्कृती व आपले पारंपरिक संस्कृती यांचे अध्ययन होणे अत्यंत गरजेचे बनले आहे .
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश पर्येकर यांनी सांगितले की ज्या गावांमध्ये सावर्डे तार या ठिकाणी आपण राहतो. त्या ठिकाणी सदर भागातील जवळपास 80 टक्के जनता ही पुरण शेतीच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत होती. मात्र गोवा सरकारने विकासाच्या नावाखाली बंधाऱयाची योजना अमलात आणल्यानंतर या पुरण शेती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन पंचायतमंत्री व्यंकटेश उर्फ बंडू देसाई यांनी यासंदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवून याचे पुनर्जीवित करून पुरण शेती संदर्भात झालेल्या नुकसानी यासंदर्भात उत्पादकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारची मागणी केली होती. मात्र त्याकडे गोवा सरकारने अजून पर्यंत लक्ष दिले नाही .यामुळे यामुळे पुरण शेतीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेला मिळालेले ऊर्जा जवळपास नष्ट झाल्याचे प्रकाश यांनी यावेळी स्पष्ट केले.









