वार्ताहर /उचगाव
बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील उचगावनजीक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्र आणि गणेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट यांच्या सौजन्याने गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी आरती संग्रहाचे प्रकाशन शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी मळेकरणी देवीच्या प्रांगणातील सभामंडपात करण्यात आला.
गणेश दूध संकलन केंद्रातर्फे सामाजिक बांधिलकीमुळे असे अनेक उपक्रम राबविले जातात. शेतकरी तसेच सर्व थरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळय़ा गोष्टींची मदत व्हावी यासाठी म्हणून असे उपक्रम सातत्याने या केंद्राच्यावतीने राबवत असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे प्रोप्रायटर उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई आणि मॅनेजर सुधाकर करटे यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.
गणेश चतुर्थीमध्ये सर्व भाविकांना सुलभरीत्या वेगवेगळय़ा देव देवतांच्या आरती म्हणण्यासाठी मदत व्हावी यासाठी म्हणून खास गणेश चतुर्थीचे अवचित साधून विशेष आरती संग्रह तयार केला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मळेकरणी देवीच्या आमराईत शुक्रवारी पार पडला. यावेळी दूध संकलन केंद्राचे मालक उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई ,मॅनेजर सुधाकर करटे, शिवप्रति÷ान हिंदुस्थान उचगाव विभाग प्रमुख नेहाल जाधव, महादेव देसाई, अरुण देसाई, सौरभ जाधव, अक्षय अष्टेकर, शेतकरी, दूध उत्पादक व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.









