केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक कार्यकर्त्यांच्या घरी
सांखळी : देशभरात भाजपचे विविध उपक्रम सुरू असून आता गोव्यातही लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सुऊवात झाली असून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन संवाद साधत आहे.गुऊवारी सुर्ला पंचायत क्षेत्रात गावकरवाडा सुर्ला येथें रामा गावकर याच्या घरी उपस्थित राहुन त्यांच्याशी चर्चा केली. व इतर ही काही कार्यकर्त्यांना भेटले. यावेळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सुभाष फोंडेकर,मनोहर वळवईकर,चंद्रकांत घाडी, जगा गावकर, मंगलदास उसगावकर रामा गावकर इत्यादी सुर्ल गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाजपचे चांगले कार्य सुरू असून2024 हे महत्त्वाचे : श्रीपाद नाईक
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा फायदा नेहमी भाजपला झाला आहे. या दाह वर्षात देशांत विकासाच्या बाबतीत गगन भरारी घेतली आहे.त्याच बरोबर देशातील काही अशक्य अशा गोष्टी कायद्याचा वापर करू शक्य केल्या आहे.आता या पुढे ही जाऊन आम्हला कार्य करायचे आहे त्यासाठी तुमचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चागले काम चालले आहे याला अधिक बळ प्राप्त होण्यासाठी 2024 लातुमचे सहकार्य असुदे देशाचा कारभार चालवण्याची तुम्ही पुन्हा एक संधी द्या असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गोपाळ सुर्लकर यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीपाद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्ला गावात झालेल्या कामांची सुभाष फोंडेकर यांनी सविस्तर माहिती दिली व यापुढे त्यांना भाजपच्या कार्यात नेहमी सहकार्य गावातून मिळून देईल असे ही फोंडेकर.. म्हणाले









