कडोली परिसरातील शेतकऱयांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांचे नेते राकेश टिकैत यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. त्याचा निषेध कडोली परिसरातील शेतकऱयांनी केला आहे. शाईफेक करणाऱयांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी या शेतकऱयांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱयांच्या विविध समस्यांसाठी अनेक महिने टिकैत यांनी केंद्र सरकारविरोधात लढा दिला आहे. त्यांनी जे जाचक कायदे होते ते मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. त्यांचे कार्य मोठे आहे. असे असताना त्यांच्यावर बेंगळूर येथील गांधी भवन येथे हल्ला होतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा तातडीने त्या आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. यावेळी आप्पासाहेब देसाई, मारुती कडेमनी, सुभाष धायगोंडे, दुंडाप्पा पाटील, चंदू राजाई, यल्लाप्पा धुडूम, राजू कागणीकर व शेतकरी उपस्थित होते.









