Sangli Flood : संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगली महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतील सुर्यवंशी प्लॉटमध्ये जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
सध्या कृष्णा नदीवरील आयुर्विन पुलाची पाणी पातळी १८ फुटावर आहे.
पावसाचा जोर आणि कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी पाहता नागरी वस्तीत पाणी येण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र पाऊसाचा जोर वाढला तर पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे खबरदारी म्हणून उपायुक्त राहुल रोकडे यानी पुर पट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट मध्ये जाऊन नागरिकांना संभाव्य पाणी पातळी वाढली तर सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे तसेच आपले साहित्य सुद्धा वेळीच हलवावे असे आवाहन केले. नागरिकांनी सध्या घाबरण्याचे कारण नाही मात्र जागृत राहावे असेही रोकडे यानी स्थानिक नागरिकांना सांगितले. यावेळी सहायक आयुक्त सहदेव कावडे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, प्रनिल माने, धनंजय कांबळे आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.









