बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्यावतीने 1 नोव्हेंबर, काळादिन हरताळ पाळण्यासाठी जागृती बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजकुमार बोकडे होते. तर गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर, सुनील बोकडे, रणजीत हावळानाचे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला महेश कुंडेकर, रजत बोकडे, रवी जाधव, परशराम शिंदोळकर, महेश पाटील, रोहित वायचळ, दीपक तुळसकर, बाळकृष्ण झेंडे, सदानंद बिर्जे, रविंद्र पवार, अतुल पारिश्वाडकर, संतोष काकतीकर, दीपक गौंडवाडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजीत हावळानाचे यांनी केले.
राम मंदिर, गाडेमार्ग शहापूर येथे आज बैठक
1 नोव्हेंबर काळा दिन या दिवशी केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, तसेच याची जनजागृती करण्यासाठी शुक्रवार दि. 27 रोजी सायंकाळी ठीक 6.30 वाजता राम मंदिर, गाडेमार्ग शहापूर येथे शहापूर भागातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी बैठकीला वेळेत उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.









