बेळगाव : भाजपने 21 ते 29 जानेवारी दरम्यान सुरू केलेल्या विजय संकल्प अभियानाबाबत आज बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी त्यांच्या मतदारसंघात घरोघरी जाऊन जनसंकल्प अभियानाबाबत जनजागृती केली.
आमदार अनिल बेनके यांनी संगमेश्वर नगर, शाहू नगर, मार्कंडेय नगर, हनुमान नगर, बसवन गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, मेनसी गल्ली, भातकांडे गल्ली, मठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, श्री गल्ली, कोनवाळ गल्ली, महांतेश नगर, वंटमोरी कॉलनी, चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर, रामतीर्थ नगर, अलरवाड आणि बसवन कुडची येथे विजय अभियानाबाबत जनजागृती करून माहिती दिली
यावेळी त्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघात आजपासून विजय संकल्प अभियान सुरू करण्यात आल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केलेली विकासकामे राबविलेल्या योजना तसेच आपण केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले.