20 लाख रुपये खर्चूनही पाण्याची गळती-कचऱयाचे साम्राज्य, अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या कक्षात अस्वच्छता, अधिकारी फिरतीवर
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्याचा विकास साधण्यासाठी तालुका पंचायत कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हे कार्यालयच विकासाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र होते. मागील वेळी 20 लाख रुपये खर्च करून त्याचा कायापालट करण्यात आला. मात्र अजूनही तेथील समस्या कायम आहेत. त्यामुळे 20 लाख खर्च करण्यात आले तरी गळती, कचऱयाची समस्या, पानाच्या पिचकाऱया आहेत तशाच आहेत.
कार्यालयाचा लूक बदलला असला तरी समस्या मात्र तशाच आहेत. त्यामुळे येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यालयाच्या चोहोबाजूंनी असलेला कचरा, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर आहे. कामाचा विस्कळीतपणा, मंजूर झालेला निधी योग्यवेळेत वापरण्यात न आल्याने कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. यासाठी काही सदस्यांनी प्रयत्न केले. मात्र ते असफल झाले. यामुळे यासाठी आता पुन्हा अधिकारी व सदस्यांनी कंबर कसणे गरजेचे आहे.
स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष्ा
दरम्यान तालुका पंचायतमधील वरि÷ अधिकारी दौऱयावर दौरा आणि बैठका तसेच फिरतीवर असल्यामुळे कार्यालयात काय चालले आहे? याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व आमदार कक्षांची अवस्था दयनीय झाली आहे. येथे अस्वच्छता पसरली असून त्याठिकाणी स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान सभागृह अस्तित्वात आल्यानंतर अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तालुका पंचायतीच्या विकासासाठी काही सदस्यांनी कंबर कसली होती. यावेळी त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष खोलीच्या रंगरंगोटीबरोबरच इतर कार्यालयांची स्वच्छताही केली होती. तत्पूर्वी येथे भटकी कुत्री आणि जनावरांचा वावर होता. तालुका पंचायत कार्यालयाच्या विकासासाठी तब्बल 20 लाखांच्या आसपास खर्च करण्यात आला. मात्र समस्या कायमच आहेत.
निधी खर्च करूनही वाया गेल्याची तक्रार
मागील वेळेच्या काही सदस्यांनी कार्यालयाचा लूक बदलण्यासाठी आपल्या अनुदानातून प्रत्येकी 20 हजार रुपये दिले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समोरील भागाची स्वच्छताही केली. तर तालुका पंचायत विकास निधीतूनही 3 लाख 50 हजारांचा निधी खर्ची घालण्यात आला. त्यामुळे काही दिवस येथे स्वच्छता होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी पाण्याच्या टाकीचे काम, शौचालय निर्मिती, सभागृहाची डागडुजी आणि छपरावरील पत्र्यांचे काम केले. मात्र आज त्यांची अवस्था जैसे थेच आहे. त्यामुळे अजूनही तालुका पंचायतमध्ये पाण्याची गळती कायम आहे. त्यामुळे निधी खर्च करूनही तो वाया गेल्याची तक्रार करण्यात येत आहे.
एकीकडे देशात स्वच्छ भारत योजनेचे वारे वाहत असताना दुसरीकडे बेळगाव तालुका पंचायत कार्यालयात अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यालयात नीटनेटकेपणा आणि शिस्त असे गुण दिसून येत नसल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांतून करण्यात येत आहे. यासाठी आता सदस्यांनी आणि येथील अधिकाऱयांनी कंबर कसणे गरजेचे आहे.
विविध कक्षात कागदांचे ढिगारे साचून
कार्यालयातील विविध कक्षात कागदांचे ढिगारे साचून आहेत. काही महत्त्वाची कागदपत्रेही धूळखात पडलेली दिसतात. तर खालील बाजूला काही खोल्यांमध्ये कचरा, धूळ आणि इतर बरेच प्रकार आढळून येतात. मध्यंतरी कार्यालयात सापांचा वावरही होता.
कार्यालयात पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय
तालुक्यातील विविध भागातून कार्यालयात दररोज नागरिकांची धावपळ असते. मात्र कार्यालयात पाणी नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. सध्या या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला पाण्याची टाकी असून ती कुचकामी आहे. तिच्या डागडुजीसाठी मध्यंतरी प्रयत्न करण्यात आले. मात्र ती नादुरुस्त झाल्याने पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









