पं. बाळासाहेब कुलकर्णी-बेडकिहाळकर जन्मशताब्दी संगीत संमेलन : कार्यक्रमात उच्चतम आनंदाचा प्रत्यय : श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद
बेळगाव : पंडित बाळासाहेब कुलकर्णी-बेडकिहाळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित संगीत संमेलनात रविवारी सकाळच्या पहिल्या सत्राची सुऊवात पणजीचे सोनिक वेलिंगकर यांच्या बासरी वादनाने झाली. त्यांचा ‘झुमरा’ तालातला विलंबित ख्याल आनंदाचे वातावरण निर्माण करणारा होता. त्यांच्याबरोबर सहवादन करणारे मोहित पुरणकर यांनीही राग विस्तारात सुंदर भर घातली. तबल्यावर पूरक साथ पुण्याच्या श्र्रीकांत भावे यांनी दिली. वेलिंगकर यांनी दुसरी प्रस्तुती राग ‘देवगिरी बिलावल’ने केली. ऊपक तालात विलंबित प्रस्तुतीमध्ये लयकारीचे छान प्रदर्शन त्यांनी केले. द्रूत एकतालात वाजवलेली बंदिश आकर्षक होती. आपल्या कार्यक्रमाची सांगता त्यांनी पहाडी धून वाजवून केली. सकाळच्या सत्रातले दुसरे पुष्प पुण्याचे अमोल निसळ यांनी ‘चाऊकेशी’ रागाच्या प्रस्तुतीने गुंफले. विलंबित एकतालात ख्याल त्यांच्याबरोबर गायन साथ शार्दुल काणे आणि करण देवगावकर यांनी केली. अत्यंत सुंदर ‘होरी’ गाऊन त्यांनी आपल्या गायनाची समाप्ती केली. गणेश तानवडे यांनी तबल्यावर आणि रवींद्र माने यांनी त्यांना हार्मोनियमवर संगत केली. सायंकालीन सत्राची सुऊवात बेळगावचे युवा गायक आकाश पंडित यांनी ‘श्र्र्री’ रागाने केली. विलंबित तिलवाडा आणि द्रुत तीनतालात त्यांनी बंदिशी सादर केल्या. पारंपरिक गायन शैलीचा आश्वासक गायक म्हणून आकाश यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांना अंगद देसाई आणि योगेश रामदास यांनी तबल्यावर आणि संवादिनीवर अतिशय सुंदर संगत केली. केतकी घारपुरे आणि आनंद चिमोटे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
कलेचे महत्त्व संस्कारांमुळेच
यानंतर बाळासाहेबांच्या कन्या आणि ज्येष्ठ लेखिका उमा कुलकर्णी यांनी वडिलांच्या आठवणी सांगितल्या. कलाकार म्हणून स्वातंत्र्य आणि आयुष्य मार्गी लागावे यासाठी शिस्त असे दोन्ही गुण वडिलांनी आम्हा भावंडांमध्ये रुजविले. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आम्हाला कलेचे महत्त्व कळले. त्या काळात त्यांनी स्त्राr-पुरुष समानता आमच्यामध्ये रुजविली, असे त्या म्हणाल्या. आम्हा सात भावंडांवर उत्तम संस्कार होतील, याबाबत ते दक्ष होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य बेळगावमध्येच गेले. आम्हाला स्वरांची ओळख व्हावी यासाठी ते रेडिओवर गीत रामायण ऐकवत असत, असेही त्या म्हणाल्या. यानंतर आर्ट्स सर्कलचे उपाध्यक्ष श्र्र्रीधर कुलकर्णी, लोकमान्य संस्थेचे अनिल चौधरी आणि संगीत कलाकार संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर यांचा सत्कार पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी केला.
श्र्र्रोत्यांना सुखावून सोडले
संमेलनाची सांगता पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरी वादनाने झाली. त्यांनी वडिलांच्या आवडीचा राग ‘कौशी कानडा’ विलंबित झपतालामध्ये वाजवण्यासाठी निवडला. संथ मधाळ आलापी, उपज अंगाने केलेली बढत, कल्पक लयकारी, आकर्षक तिहाया या सर्व वैशिष्ट्यांनी त्यांचे वादन रंगले. गोव्याचे उदय कुलकर्णी यांनी दिलेली रंगतदार तबला संगत श्र्र्रोत्यांना सुखावून गेली. द्रुत त्रितालामधली गत संपूर्ण कार्यक्रमाच्या उच्चतम आनंदाचा प्रत्यय देणारी ठरली. राजेंद्र यांनी जन्मशताब्दी कार्यक्रमाची सांगता पˆा बाबूंच्या सुप्रसिद्ध ‘भैरवी’ने केली. त्यांना बासरीवर वादन साथ मोहित पुरणकर यांनी केली. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.









