ऑनलाईन टीम / पुणे :
कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी (PSI recruitment scam) गुन्हे अन्वेषण विभागाने भाजप नेत्या दिव्या हागारगीसह (Divya Hagaragi) पाच जणांना पुण्यातून (CID arrested 5 persons in pune) अटक केली आहे.
दिव्या हागारगी या कलबुर्गी ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल चालवतात. तिथेच पीएसआय भरती घोटाळा झाला होता. त्यावर गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. दिव्या यांचा पती राजेश हगारगी याला यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सीआयडीने दिव्या यांना अटक करण्यासाठी टीम तयार केली होती. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या आरोपी ज्योती पाटीलने दिलेल्या माहितीवरुन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात जाऊन दिव्यासह पाच आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ, पर्यवेक्षक अर्चना, सुनंदा आणि पीएसआय उमेदवार शांताभाई यांचा समावेश आहे. आज दिव्या हागारगी यांना कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे.









