वृत्तसंस्था/ नेनटेस
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात ख्रिस्टोफ गेलटायरच्या मार्गदर्शनाखाली पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) संघाने नेनटेसचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या सामन्यात पीएसजी संघातील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू नेमारला विश्रांती देण्यात आली होती. 2022-23 युरोपमधील फुटबॉल स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱया नेमारच्या गैरहजेरीत पीएसजीने दर्जेदार कामगिरी केली. या सामन्यात पीएसजी संघातील ब्राझिलचा फुटबॉलपटू केलियान एम्बापे आणि अर्जेंटिनाचा मेसी यांनी दर्जेदार खेळ केला. या सामन्यात ब्राझिलच्या एम्बापेने 2 गोल नोंदविले. चॅम्पियन्स लीग-1 फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी सायंकाळी झालेल्या सामन्यात पॅरिस सेंट जर्मनने प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविला होता. आता पीएसजी संघाचा आगामी सामना बलाढय़ ज्युवेंट्सबरोबर होणार आहे.









