बेळगाव : महात्मा फुले रोडवर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते गोवावेस दरम्यान रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या शोभिवंत झाडांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर शोभिवंत रोपांचा अडथळा निर्माण होत होता. दरम्यान त्याची छाटणी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत प्रशासनातर्फे छाटणी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत आणि फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे या रोपांची जोमाने वाढ झाली आहे. काही ठिकाणी ही रोपे मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरू लागली आहेत. शहरातील काँग्रेस रोड, कॉलेज रोड, क्लब रोड, आंबेडकर रोड आदी ठिकाणी दुभाजकांवर शोभिवंत रोपे लावली आहेत. मात्र योग्य देखभालीअभावी ती वेडीवाकडी वाढली आहेत. यंदा झालेल्या दमदार पावसामुळे रोपांची वाढ झाली आहे. शिवाय आता पाऊस ओसरल्यानंतर वाढ झालेल्या रोपांची छाटणी केली जात आहे.
Previous Articleडीएपी-युरियाची कमतरता भासू देऊ नका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









