आंदोलन अजूनही सुरूच
अन्यायाविरुद्ध उपाशी लढत असलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेचे कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शहराच्या स्वच्छता दूतांना सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलील यांच्या पुढाकारातून दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली . वर्षाचे बाराही महिने शहराचा केर कचरा व घाण उचलणाऱ्या या 60 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आज उपासमाराची वेळ आली आहे . शहरातील केरकचरा व घाण उचलून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने पगार नसून तीन वर्षाचा पीएफ ही ठेकेदाराकडून देण्यात आला नाही. अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे. याकरिता सावंतवाडी नगरपरिषद समोर दोन महिन्याचा पगार व तीन वर्षाचा पीएफ मिळावा याकरिता नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरणे दुरच त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळी आली आहे. यासाठी ते अन्यायाविरुद्ध लढत आणि या त्यांच्या लढ्यासाठी सावंतवाडी शहरातील नागरिकांनीही सहभाग घेतला आहे . तसेच सामाजिक बांधिलकीने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीच्या समीरा खालील यांनी पुढाकार घेऊन त्यांना भोजन व्यवस्था केली आहे. यासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, हेलन निबरे संजय पेडणेकर, सतीश बागवे, शैलेश नाईक, शाम हळदणकर, शरद पेडणेकर ,अशोक पेडणेकर,शेखर सुभेदार, प्रसाद कोदे, व सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार या सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केले. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते करत आहे.