सावंतवाडी प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद प्रांत विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि नूतन निवड प्रक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० सप्टेंबर रोजी कुडाळ येथे मराठा मंडळाच्या सभागृहात सकाळी 11.45 वाजता संपन्न होणार असून या सभेला कोमसापचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक , पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृह येथे नवीन कार्यकारणीची पहिली बैठक अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत वार्षिक सभेचे नियोजन करण्यात आले . कोमसापच्या वतीने जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये , शाखा स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर ही सभा होत असून सभा यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सभेला जवळपास दीडशेहून अधिक सभासद उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात बैठका नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाखांचे आजीव सदस्य. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या दृष्टीने बैठकीत निश्चित करण्यात आले. तालुकाध्यक्षांवर तशी जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष मंगेश मस्के यांनी स्पष्ट केले की , सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण मराठी साहित्य परिषदेची प्रांत विभागाची वार्षिक सभा होत आहे. या सभेला संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याने मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सदस्य उपस्थित रहावे या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करूया आणि ही सभा यशस्वी करूया . या सभेचे वाचन जिल्हा सचिव. ॲड संतोष सावंत यांनी केले.. जिल्ह्यात साहित्य चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी ज्या तालुक्यात कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा कार्यरत नाहीत त्या शाखा कार्यरत करण्याच्या दृष्टीने ठरविण्यात आले अशा चार ठिकाणी त्या तालुक्यात जाऊन बैठका घेऊन जुने आजीव सदस्य यांना एकत्रित करून त्या ठिकाणी नव्याने शाखा गठित करण्याचे ठरले. त्याचबरोबर युवा साहित्यिक यांची संख्या वाढवून. प्रत्येक तालुक्यात युवा साहित्य विभाग कोकण मराठी साहित्य परिषदेचा तयार करण्याबाबतही चर्चा झाली. आधी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कुडाळ येथे 20 सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्यांनी पुस्तक छपाई केली असेल तर त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी वृंदा कांबळी यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आला. यावेळी खजिनदार अनंत वैद्य व जिल्हा साहित्य संमेलनाचे प्रमुख विठ्ठल कदम , भरत गावडे ,माधव कदम ,राजू तावडे ,अभिमन्यू लोंढे ,दीपक पटेकर यांनी आपले विचार मांडले. या बैठकीत. जिल्हाध्यक्ष. मंगेश मस्के सचिव. ॲड संतोष सावंत ,खजिनदार अनंत वैद्य, सहसचिव सुरेश पवार, माधव कदम,वृंदा कांबळी., विठ्ठल कदम, भरत गावडे., अभिमन्यू लोंढे ,गणेश जेठे. दीपक पटेकर, राजू तावडे ,निलेश ठाकूर. आधी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत व आभार. सचिव. ॲड संतोष सावंत यांनी मानले.









