Provided guidance on mental health at Upazila Hospital
उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशिका श्रीमती अदिती कशेळीकर यांनी मानसिक तणावाची कारणे, शिक्षण, भविष्य , नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी तणाव या बद्दल माहिती दिली, अपघाता नंतर, व खराब जीवन शैली मुळे येणारे नैराश्य,तसेच मानसिक आरोग्य समस्या म्हणजे नैराश्य, चिंता विकार, स्मृतिभ्ंश, सिझोफ्रेनिया, इत्यादी आजाराबाबत कशा प्रकारे रुग्णालयात निदान केले जाते, व त्यानंतर उपचारा व्यतिरिक्त अशा रुग्णांचे समुपदेशन केले जाते, याची माहिती दिली. लोकांची मानसिक आरोग्य विषयी जागरूकता वाढली असली तरी अजून ही बरेच लोक उपचार घेणेस टाळाटाळ करतात, तरी अशा रुग्णांनी न घाबरता आपल्या समस्या मांडाव्यात जेणेकरून त्या वर वेळेत निदान करून उपचार व समुपदेशन करता येईल , असे आवाहन केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी