होमगार्ड्सची कामगार हक्क मंचच्या माध्यमातून मागणी
बेळगाव : राज्यात 25,882 होमगार्ड आहेत. निवडणुका, सण-उत्सवावेळी हे होमगार्ड्स पोलिसांच्या बरोबरीने सेवा बजावत असतात. परंतु, त्यांना वर्षभरातील काही मोजकेच दिवस सेवा दिली जाते. त्याऐवजी 365 दिवस पूर्णवेळ सेवा देण्याची संधी द्यावी, यासाठी कामगार हक्क मंचच्यावतीने सोमवारी सुवर्णविधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. वर्षातील काही मोजकेच दिवस सेवा द्यावी लागत असल्याने इतर दिवशी अन्य व्यवसायांवर अवलंबून रहावे लागते. यामुळे कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्न होमगार्डसमोर आहे. हजारो होमगार्ड हे एमए, एलएलबी, बीए, बीएड यासह उच्चपदवी घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, होमगार्डना पोलीस भरतीत 50 टक्के आरक्षण द्यावे, जोवर पूर्णवेळ ड्युटी दिली जात नाही तोवर नवीन भरती थांबवावी, यासह विविध मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या.









