शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांना प्रस्ताव
बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पिण्याचे पाणी नेले जात असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची बेंगळूर येथे भेट घेऊन चर्चा केली. हिडकल जलाशयातून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली औद्योगिक वसाहतीसाठी पाणी नेले जात असल्याने त्याला बेळगावकरांतून तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे हुबळी-धारवाडला हिडकल जलाशयातून पाणी देण्यात येऊ नये. त्या बदल्यात सांडपाणी प्रकल्पातून शुद्धी केलेले पाणी पुरविण्यात यावे, याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सुजित मुळगुंद यांच्यासह समाजसेवक व शेतकरी उपस्थित होते.









