मागासवर्गीय कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मागासवर्गीय कायदा पदवीधरांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. संकटात सापडलेल्या पदवीधरांना न्यायालयामध्ये सेवा देण्यास अडचणीचे जात आहे. यासाठी कायदा पदवीधरांना पाच वर्षांपर्यंत महिना 10 हजार रु. प्रशिक्षण भत्ता देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वामध्ये मागासवर्गीय कल्याण खात्याचे अधिकारी शिवप्रिया कडेचूर यांना यांना देण्यात आले. मागासवर्गीय समाजातील अनेक जणांनी कायद्याची पदवी घेतली आहे. हे पदवीधर न्यायालयामध्ये सेवा बजावत आहेत. मात्र आर्थिक संकटामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी मागासवर्गीय कायदा पदवीधरांना पाच वर्षांपर्यंत प्रत्येक महिना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात यावा. पेशा पुढे चालविण्यासाठी सोय करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अॅड. निंगाप्पा मास्ती, अॅड. विनोद पाटील, अॅड. रुपेश लातूर, अॅड. यशवंत लमाणी, अॅड. नारायण बिरंगी, अॅड. गंगाधर शेगुनशी, अॅड. चेतन हेडगे आदी उपस्थित होते.









