प्रतिनिधी
बांदा
माजगाव सरपंच अर्चना सावंत यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी
माजगाव गावाचे नागरीकरण व शहरीकरण दिवसेंदिवस वाढत असल्याने सांडपाणी घनकचरा व प्लास्टिक समस्या निर्माण होत आहे. सदरची समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सांडपाणी व घनकचरा/प्लास्टिक कचऱ्या अंतर्गत प्रस्ताव सादर केला. त्यास मान्यता सुदधा मिळाली मात्र यासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध नसल्याने मान्यता असूनही प्रकल्प बाबत कार्यवाही होत नाही तरी माजगाव ग्रामपंचायत हद्दीत महाराष्ट्र शासनाची असलेल्या जागे पैकी जागा आम्हास उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत यांनी बांदा येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनातुन केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले की, लोकसंख्या अंदाजे 10160 पेक्षा अधिक आहे. सदरची समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सांडपाणी व घनकचरा/प्लास्टिक कचऱ्या अंतर्गत प्रस्ताव सादर केला असून त्याला मान्यता मिळाली आहे. मात्र सदर प्रकल्पासाठी लोकवस्ती पासून दूर अंतरावर आवश्यक जमीन ग्रामपंचायत माजगाव कडे उपलब्ध नाही.त्यामुळे प्रकल्पाला मान्यता असूनही कार्यवाही करण्यात अडचणी निर्माण होत आहे. माजगाव कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासनाच्या नावे जमीन असून सदरच्या क्षेत्रापैकी 10 गुंठे जागा ग्रामपंचायत माजगाव यांना शासनाने द्यावी अशी मागणी प्रस्ताव आम्ही शासनाकडे दिला आहे तरी आपल्या मार्फत याबाबतची कार्यवाही होऊन जमीन ग्रामपंचायत माजगावला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनातुन केली









