दलित संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : माणिकवाडी, ता. खानापूर येथे स्मशानासाठी जागा द्यावी, याआधी आश्वासन दिल्याप्रमाणे मंदिर बांधून देण्याची मागणी दलित संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गावातील कोणाचा तरी मृत्यू झाल्यास रात्रीच्या वेळी शेतजमिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे स्मशानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मल्लेश कांबळे, प्रकाश कांबळे, अशोक कोलकार, प्रियांका जैनर, लक्ष्मी गोटूर आदी उपस्थित होते.









