विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये निवडून आलेल्या पंचमसाली समाजाच्या आमदारांचा सत्कार समारंभ बेंगळूर येथे मंगळवार दि. २३ रोजी पार पडला.
कुडलसंगम लिंगायत पंचमसाली जगद्गुरू महापीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या सान्निध्यात आयोजित समारंभात अनेक ठराव संमत करण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह लिंगायत पंचमसाली समाजाच्या ५ आमदारांना मंत्रीपद देण्यासाठीची मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार व एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना करण्यात आली तसेच १६ व्या विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद आणि भाजप प्रदेशाध्यक्षपद देखील पंचमसाली समाजाच्या सदस्यांनाच देण्याची मागणी करण्यात आली.
या समारंभात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विनय कुलकर्णी, राजूगौडा कागे, राजूगौडा पाटील, अशोक मनगुळी, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळीसह इतर नेतेमंडळी उपस्थित होते.