शेतकऱ्यांची रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : कणबर्गी रेल्वेगेट परिसरात शेतकऱ्यांना अनेक समस्या आहेत. रेल्वेगेटच्या पलिकडे जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेला नाला व ब्रिज हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नुकतेच नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेगेटची पाहणी केली. शेतकऱ्यांनी आपले म्हणणे शेतकऱ्यांसमोर मांडले. पिकाऊ माल बाजारात ने-आण करण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी रेल्वे गेटनजीक अडथळे निर्माण होत आहेत. अधिकाऱ्यांनी सर्व माहिती घेवून ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देवू, असे आश्वासन दिले. यावेळी मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









