मध्यवर्ती म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषेतून परिपत्रके, फलक, बसवरील फलक, सरकारी कार्यालयामधील फलक तिन्ही भाषेत लिहावेत यासह इतर मागण्यांसाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
सीमा भागामध्ये मराठी भाषिक मोठय़ा संख्येने राहतात. त्या सर्वांना मराठी भाषेतून परिपत्रके देणे बंधनकारक आहे. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने यापूर्वी अनेकवेळा आदेश बजावले आहेत. याचबरोबर उच्च न्यायालयानेही सरकारला मराठी भाषेतून परिपत्रके द्यावीत असे सुनावले होते.
वास्तविक ज्या भागामध्ये पंधरा टक्के पेक्षा अधिक जनता एक भाषेची राहत असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतून कागदपत्रे उपलब्ध करून देणे घटनेमध्येच नमूद करण्यात आले आहे. भाषिक अल्पसंख्यांक आयोगानेच हे नमूद केले आहे. तरीदेखील मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेमध्ये परिपत्रके उपलब्ध करून दिली जात नाहीत.
त्यामुळेच मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी दीपक दळवी, शुभम शेळके, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, मनोज पावशे, मदन बामणे, पिराजी मुचंडीकर, सुरेश डुकरे, प्रकाश शिरोळकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, ऍड. सुधीर चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.