प्रतिनिधी / बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात यासाठी कोल्हापुर येथील रेणुका भक्त संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पाच ते नऊ डिसेंबर पर्यंत कोल्हापूरचे भक्त येथे येत आहेत. त्यामुळे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर येथून येणाऱ्या भक्तांची वाहने अडवू नयेत, त्यांना पार्किंगची सोय करावी, पार्किंग शुल्क देखील कमी करावे, त्या ठिकाणी वीज व राहण्याची सोय करावी, मंदिराच्या परिसरात डिजिटल स्क्रीन उपलब्ध करावी जेणेकरून पूजा करताना सर्व भक्तांना दिसेल. तसेच यात्रोत्सव काळात मद्य व मांसाहार जेवणावर पूर्णपणे निर्बंध घालावे. महिलांसाठी शौचालय व इतर सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. यासह इतर मागण्या करण्यात आल्या.