सतत बदलत राहणारे हवामान हा मोठा प्रश्न शास्त्रज्ञांसमोर उभा आह़े केवळ शेतीच नव्हे तर माणसासह जीवसृष्टीवर हवामान बदल परिणामकारक ठरत असत़ो अनेकांची आयुष्य त्यामुळे बदलत असतात़ जीवनपद्धतीमध्ये देखील मोठे बदल होत असतात़ यावर मार्ग काढण्यासाठी जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञ काम करत आहेत़ तथापि हवामान बदलाचा परिणाम घडत असल्याने सर्वांनी ती प्रक्रिया समजून घेऊन त्याला सामोरे गेले पाहिज़े
कोकणामध्ये हापूस आंब्याचे पीक खूप महत्त्वाचे पीक आह़े लोकांच्या चरिर्थावर थेट परिणाम करणारा हा घटक आह़े दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे चार महिने पावसाळा हंगाम म्हणून निसर्ग चक्रात निश्चित झाला आह़े राज्यातील इतर ठिकाणापेक्षा कोकणात अधिक पाऊस पडत असत़ो तथापि हा पाऊस लांबला तर त्यापुढच्या हंगामावर परिणाम होत असत़ो
यावर्षी पावसाळा संपून मान्सून मागे फिरण्यासाठी थोडासा अधिक कालावधी गेल़ा ऑक्टोबर महिन्याचा निम्मा भाग उलटून गेला तरी देशाच्या पूर्व किनाऱयावरील वादळांचा फटका हवामानाला बसत होत़ा ऑक्टोबर महिन्याचा अधिक काळ भरपूर पावसाचा होत़ा त्यामुळे वातावरणातील तापमान अपेक्षित प्रमाणात वाढले नाह़ी त्यामुळे या कालावधीत हापूस आंबा झाडांसह अन्य झाडांना पालवी आली नाह़ी
नोव्हेंबर महिन्याची सुरूवात होण्यापूर्वीच थंडीचे आगमन झाल़े यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी उपयुक्त काळ सुरू झाल्याचे मानण्यात येत आह़े पावसाळा लांबला तरी थंडी वेळेवर सुरू झाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनावर फार मोठा दुष्परिणाम होणार अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े त्याचवेळी निसर्गचक्र अपेक्षेप्रमाणे सुरू राहिले असते तर आंब्याचे उत्पादन अधिक चांगले राहिले असते असे सांगणारे अनुभवी शेतकरी कोकणात आहेत़
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर अखेरपर्यंत हापूस आंबा झाडांना मोहोर येण्यास सुरूवात होईल, अशी अपेक्षा आह़े सध्या निम्म्यापेक्षा कमी झाडांना नवी पालवी फुटली आह़े त्यामुळे पालवी न फुटलेल्या ठिकाणी आंबा मोहोर सहजी तयार होण्याची शक्यता वाढली आह़े काही ठिकाणी आंब्याला मोहोर उशिरा आल्याने डिसेंबरपर्यंत आंबा मोहोराची फुट पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े हवामान बदलाचे कमी अधिक परिणाम होणे अनुभवी शेतकऱयांना अपेक्षित आह़े
ड़ॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या आठवडय़ात शेतकऱयांसाठी काही सूचना दिल्या आहेत़ हवामान कोरडे राहिल आणि कमाल, किमान तापमान सरासरी इतके राहिल़ विद्यापीठाने म्हटले आहे की, नाल्यांमध्ये कच्चे बंधारे बांधून पुढील दोन तीन महिन्यांसाठी पाणीसाठा अधिक स्वरूपात शिल्लक राहिल़ पालवी अवस्थेत असलेल्या आंबा कलमांना तुडतुडय़ांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती फवारणी कराव़ी भातपिकाची कापणी, झोडणी वेळेवर कराव़ी कापणी उशिरा झाल्यास कणीचे प्रमाण वाढत़े म्हणून ती वेळेवर कराव़ी नागली वरी पिकाची कापणी, मळणी कराव़ी वालासारख्या कडधान्य पिकाची पेरणी याच कालावधीत कराव़ी मधुमका म्हणजे अधिक गोडीचा मका लागवड कराव़ी काजूच्या नवीन पालवीवर रोग पडण्याची शक्यता आह़े तेथेही किटकनाशकाची फवारणी अपेक्षित आह़े कलिंगड लागवडीसाठी शेतकऱयांनी प्रक्रिया सुरू करावी, अशी शिफारस विद्यापीठाकडून करण्यात आली आह़े
विद्यापीठाचा सल्ला शेतकरी वर्ग नेहमी लक्षात घेत असत़ो तथापि तेवढय़ाच मुद्याने हवामान बदलामुळे निर्माण हाणाऱया समस्या दूर होणे कठीण आह़े काहीवेळा शेतीचे उत्पादन चांगले रहावे म्हणून शिफारसी होतात़ तथापि वादळ, वारा, कमी तापमान, अचानक हवामान बदलामुळे वाढणारे किडरोग यामुळे शेतकरी आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत उभे असतात़ एखादी वेळी काही कारणाने उत्पादन कमी आले तर हाती आलेल्या उत्पादनाला अधिक चांगल्याप्रकारे बाजारभाव मिळावा म्हणून योजना झाल्या पाहिजेत़ सध्या बाजारतंत्र अन्य घटकांच्या हातात असल्याने शेतमालाला चांगला भाव मिळणे हे आव्हानात्मक आह़े शेतकऱयांचे हीत साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे सांगणाऱया राजकीय नेत्यांनी बाजार तंत्रावर योग्य त्या प्रमाणात नियंत्रण आणले तर उत्पादकाला चांगला भाव मिळू शकेल़ हवामान बदलाच्या आपदेतून दिलासा मिळण्यासाठी ते पाऊल आश्वासक ठरेल़
कोकणातील शेतकरी मुंबईतील फळबाजारावर अवलंबून आहेत़ याशिवाय निर्यात अभिमुख उद्योगांना हापूस आंबा हा कच्चा माल म्हणून मोठय़ा प्रमाणात लागत असत़ो आंबा उत्पादक आपला माल निर्यातीसाठी देत असतात़ आंबा फळ विक्री हा महत्त्वाचा घटक आह़े फळावर प्रक्रिया करणाऱया व्यवस्था जेवढय़ा प्रमाणात वैविध्यपूर्ण होतील तेवढय़ा प्रमाणात शेतकरी चांगल्या प्रकारे भाव मिळवू शकेल़ यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आह़े
कृषी उत्पादनामध्ये प्रक्रिया करताना अभिनव करताना पुढे घेऊन येणाऱयांना शासकीय स्तरावरून पाठिंबा मिळायला पाहिज़े वेगवेगळ्या कारणांमुळे सरकारी कामे अडचणीत सापडतात़ कुणा अधिकाऱयांना किंवा लोकप्रतिनिधींना भेटल्याशिवाय अभिनव प्रक्रिया पुढे जात नाहीत, अशी अवस्था आह़े शेती उद्योगात नव्या कल्पना आल्याशिवाय प्रगती अशक्य आह़े नव्या कल्पनांच्या स्वागतासाठी भाषणे ठोकणारे राजकीय पक्षामध्ये आहेत़ तथापि त्यासाठी कृती करणे ही बाब अभावानेच आढळत असत़े शेतकरी हिताचा मुद्दा मार्गी लावायचा असेल तर हितसंबंधापलीकडे जाऊन पावले उचलली पाहिजेत़ यावर्षी पावसाळ्याच्या कालावधीत काहिशी वाढ झाली असली तरी हिवाळा मात्र वेळेवर सुरू होत आह़े अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यासारख्या अडचणी न येता हा ऋतू पार पडला तर कोकणी शेतकरी आनंदी असेल आंबा व काजूच्या चांगल्या उत्पादनासाठी तशी आवश्यक बाब आह़े अर्थात हे मुद्दे लोकांच्या हाती नाहीत़ हवामान आधारित पीक विमा पद्धत लागू करण्यात आली असून शेतकऱयांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात येत़े शेतकऱयांना अपेक्षित असलेला दिलासा या पिक विमा योजनेत मिळत असेल का याचा आढावा दरवर्षी घेतला पाहिज़े शेतकऱयांच्या सूचना लक्षात घेऊन त्यामध्ये बदल केले पाहिजेत़
सुकांत चक्रदेव








