एक जखमी; चौघांवर गून्हे दाखल; गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
सांगरूळ / वार्ताहर
पासार्डे येथे विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीवर विरोधी गटाच्या समर्थकांनी दगडफेक केल्याने एक जण जखमी झाला असून बोलेरो गाडीचे नुकसान झाले आहे .पोलिसांनी चौगाव वर गुन्हा दाखल केला असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यापासून पासार्डे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री शंभु महादेव भेंडाईदेवी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून पॅनेल प्रमुख के के चौगले, संभाजी चाबूक,लकुळा पाटील यांचे पॅनेलने सरपंच पदासह ५जागा जिंकत सत्तांतर केले आहे. तसेच या आघाडीचे ४ उमेदवार अवघ्या २-३ मतांनी पराभूत झाले आहेत. विरोधी तुकाराम पाटील व बाजीराव चौगले यांच्या श्री महालक्ष्मी भेंडाळी देवी ग्रामविकास पॅनेलला ४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
विष्णू पाटील सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची गावातुन विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी पराभूत गटाच्या समर्थकांनी विजयी मिरवणुकीवर व दगडफेक केली. यात भरत चौगले हे जखमी झाले आहेत. तर बोलोरो गाडीचे नुकसान झाले आहे. याबद्दल रणजित बाजीराव पाटील, राजाराम निवृत्ती पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील,सर्जेराव निवृत्ती पाटील यांचे विरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.जखमी भरत शिवाजी चौगले यांचेवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास जालींदर पाटील करत आहेत.या दगडफेकीनंतर गावात पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.









