जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सावंतवाडी प्रतिनिधी
मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत निंदनीय प्रकार घडला. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ निषेध व्यक्त करत आहे . हे कृत्य अत्यंत चुकीचे असून घटनात्मक आणि मानवी हक्काची पायमल्ली झाली आहे . आम्ही देशाच्या रक्षणासाठी प्राण लावत असताना आपण आमच्या माता-भगिनींच्या रक्षणासाठी पावले उचलावीत असे या संघाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . मणिपूर येथे जो प्रकार झाला हा एक प्रकारचा गुन्हा आहे. याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष तातोबा गवस ,उपाध्यक्ष दीपक शिर्के, सचिव संजय सावंत ,सहसचिव सरोजनी दाभोळकर ,खजिनदार जगन्नाथ परब ,संजय गवस ,गजानन तेजा, महादेव राऊळ ,शामसुंदर सावंत, महेश पालव, बाळकृष्ण चव्हाण, अनिता गवस आदी उपस्थित होते .









