कोल्हापूर :
कागल येथील खासगी आरटीओ चेक पोस्टला विरोधच राहणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता या विरोधात कागल येथील चेक पोस्ट येथे वाहनासह धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा लॉरी असोSिशनने दिला आहे. कागल येथील चेक पोस्ट सुरू करू नये, अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा कागल तालुका येथील खासगी आरटीओ चेक पोस्ट (बॉर्डर) सुरू करण्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर व लॉरी असोसिएशन पदाधिकारी यांची शुक्रवारी आरटीओ ऑफीसमध्ये संयुक्त बैठक झाली.
राज्य शासनाच्या 25 मार्च 2008 रोजीच्या जीआर नुसार कागल येथील नव्याने सुरू होणाऱ्या खासगी चेक पोस्ट येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. केवळ रिकामे दुकान गाळे तयार केले आहेत. आरटीओ चेक पोस्टवर ड्रायव्हर क्लीनरसाठी रेस्टॉरंट व विश्रांती ग्रह, ढाबा जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर डॉक्टर, एस,टी,डी. पीसीओ, सायबर कॅफे, ई सुविधा केंद्र एटीएम, टायरवाला पंक्चर वाला, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट मेकॅनिकल इलेक्ट्रिक रिपेरिंग वर्कशॉप या सुविधा पुरवायच्या आहेत. या सुविधा पुरवल्याशिवाय व सीओडी (कमर्शियल ऑपरेशन डेट) मिळाल्याशिवाय चेक पोस्ट सुरू नये, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केली. परंतू कोल्हापूर डिस्टिक लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा या खासगी आरटीओ चेक पोस्टलाच विरोध आहे. ते कोणत्याही परिस्थितीत सुरू करू दिले जाणार नाही. सोमवारी (दि.9) कागल येथील खासगी आरटीओ चेक पोस्टवर वाहनासह धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर, संचालक शिवाजी चौगुले, गोविंद पाटील, उत्तम पसारे, कोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष विजय तेरदाळकर, आदी उपस्थित होते.
शाहू नाक्यापासून वाहनांची रॅली
मुळातच खासगी आरटीओ नाक्याला सर्व वाहनधारकांचा विरोध आहे. त्यामुळे या विरोधात सोमवारी कागल येथील चेकपोस्ट येथे वाहनांसह धरणे आंदोलन केले जाणार आहे. शाहू नाका येथून सकाळी 10 वाजता वाहने रॅलीने कागल चेक पोस्ट नाकाकडे रवाना होतील.
सुभाष जाधव, अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर असोसिशन








