Protest on 26th if perscene fishing is not stopped from today
बाबी जोगी यांचा पालकमंत्र्यांना इशारा
राज्य शासनाच्या ५ फेब्रुवारी २०१६ च्या अधिसूचनेनुसार १ जानेवारी ते ३१ आॕगस्टपर्यंत राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात पर्ससीन नेट मासेमारीवर बंदी लागू झाली आहे. मात्र ही बंदी झुगारून जर अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी पर्ससीन मासेमारी सुरू राहिल्यास येत्या २६ जानेवारी रोजी भर समुद्रात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघ उपाध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिला आहे.
मालवण / प्रतिनिधी









