राजापूर प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना घटनास्थळापर्यंत जाण्याच्या मार्गावरच अडवले. अनेक आंदोलनकर्त्या महिला रस्त्यावर झोपून राहिल्या होत्या.
रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेले बारसू भागातील मातीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी आधीपासूनच परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.