म्हापसा : राज्यात टोमॅटो, भाज्या आज महाग झाल्या आहेत त्या येत्या 14 ऑगस्ट त्या जनता दरबार पूर्वी स्वस्त झाल्या नाही तर आम्ही काँग्रेस पक्ष जनता दरबार बाहेर निषेध करणार आहोत अशी माहिती काँग्रेस नेते विजय भिके यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर कळंगूट गटाध्यक्ष अतुल नाईक, म्हापसा गटाध्यक्ष अॅङ शशांक नार्वेकर उपस्थित होते. हा आमचा शांततेत मोर्चा असणार आहे अशी माहिती भिके यांनी दिली. जनता दरबार 15 दिवसात सर्व रस्ते बुजविणार असे मंत्री काब्राल यांनी सांगितले होते. कुठे गेले ते जेट मशीन. ही जनतेची फसवणूक असून याबाबत आम्ही जाब विचारणार. आम्ही वीसही मतदारसंघात खड्याबाबत आंदोलन करणार. वीज दरवाढ बाबतही आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन छेडणार असे भिके म्हणाले.
महागाई वाढीस सरकार जबाबदार
आज महागाई वाढली त्याचे कारण सरकारच आहे. हे सरकार भ्रष्टाचारात बुडले आहे. त्यांच्या तोंडावर टेप मारली आहे. या सरकारने सांगितले होते राज्यात पेट्रोल वाढणार नाही. आज ते 60 वरून 100 वर पोचले आहे. गॅस सिलिंडर 450 वरून आज हजारावर पोचले. निवडणुकीवेळी सरकार फक्त गाजर दाखवतात. कडधान्य महागाई भत्ता, सोशल सेक्युरिटी, लाडली लक्ष्मी, गृहआधार कुठे गेली. सहा महिने पैसे पोचत नाही असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन कुठे गेले
आता रस्ते खोदले त्यांना मोठे ख•s चर पडलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते रस्त्यावर एकही ख•ा दिसणार नाही. आता ते कुठले ख•s हे कळत नाही. याला जबाबदार कोण. आज जनता दरबार घातला तो फसवणूक करण्यासाठी घेतला आहे. हा प्रत्येक मतदारसंघात घ्यायला पाहिजे. ग्रामीण भागात ज्या समस्या आहेत त्या प्रथम सोडवा असे भिके म्हणाले.









