आदित्य ठाकरेंसह अनेक बडे नेते मालवणमध्ये येणार ; फोवकांडा पिंपळ येथे होणार सभा
मालवण / प्रतिनिधी
राजकोट शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर आज मालवणमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अंबादास दानवे, भास्कर जाधव यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. फोवकांडा पिंपळ याठिकाणी सभा होणार आहे. बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी निषेध व जनसंताप मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.









