विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा सहभाग
वार्ताहर/बाळेकुंद्री
बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लीम कट्टरपंथीद्वारे अत्याचार होत आहे. याचे तीव्र पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ बैलहोंगल तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने बांगलादेश विरोधात सोमवार मोर्चा काढून तीव्र आंदोलन घेडण्यात आले. यावेळी बैलहोंगल उपविभागीयअधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदकुमार वक्पुंदमठ, तालुका अध्यक्ष काशीनाथ बिरादार, बजरंग दल तालुका संयोजक गिरीश हरकुनी, शिवानंद जिद्यीमनी, सोमनाथ सापीमठ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख गल्लीतून मिरवणूक काढत हातात निषेधाचे फलक घेऊन बांगलादेश सरकारविरोधी घोषणा दिल्या.
हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी कठोर भूमिका घेण्याचे निवेदन बैलहोंगल उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बांगला देशामध्ये हिंदू समाजावर मुस्लीम कट्टरपंथीयाद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलावर अमानवीय अत्याचार होत आहेत. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. हिंदू समाजाच्या संवर्धनासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आनंद वाली. विवेकानंद पुजेरी, मल्लिकार्जुन ऐनगीमठ, जगदेश लोकापूर, राजू बोंगाळे, विजय पत्तार, संगमेश सवदंतीमठसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.









