कोल्हापूर प्रतिनिधी
शेतीपंपासाठी लागण्याऱ्या पाण्य़ाला उपसाबंदी जाहीर झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उपसाबंदी मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची सिंचन भवनावर धडक मोर्चा काढून सिंचन भवनाच्या दारात ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यात पाण्याच्या अपुऱ्या साठ्याचे नियोजन करण्यासाठी जलसिंचन विभागाने जिल्ह्यात शेतीपंपासाठी उपसाबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी आणि दैनंदीन वापरासाठी प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे सांगून ही उपसा बंदी करण्यात आली आहे. त्यातच मान्सून लांबल्याने हि परिस्थिती पुन्हा बिकट होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे उपसाबंदी घेतली असल्याचे विभागाने जाहीर केले होते.
इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वातखाली शेतकऱ्य़ांनी हे आंदोलन पुकारले. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके करपून गेली आहेत. त्यातच पाठबंधारे खात्याने उपसाबंदी घातल्याने पुढल्या वर्षी खायचे काय ? असा सवाल शेतकऱ्यांनी करत सिंचन भवनाच्या दारात शेतकऱ्यांनी ठिया मारला. अधिकाऱ्यांच्या विनंती नंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चेला झाली. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद माजी सदस्य बाबासाहेब देवकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुर्यवंशी, बुद्धीराज पाटील यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.