सांगली : राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतीने आज उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात “गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी ” अश्या घोषणा देत निषेध आंदोलन केले. सांगलीतील महात्मा गांधी स्मारक स्टेशन रोड येथे करण्यात आले. यावेळी महिलानी राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, महिला सांगली जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव , सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम , मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे , अनिता पाटील, मेघा पाटील, छाया जाधव, अनिता कदम, वंदना चंदनशिवे, अलका माने,वैशाली कळके , गीतांजली इरकर, उषा गायकवाड , वैशाली पाटील ,छाया पांढरे , चंपाताई जाधव सुजाता हेगडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








