वार्ताहर /कडोली
बुधवार दि. 17 रोजी मतिमंद तरुणीवर एका नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ कडोली गावात बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. घरात कोणी नसताना एका नराधमाने मतिमंद तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही घटना अत्यंत घृणास्पद असून, अशा नराधमाला कठोरातकठोर शिक्षा झाली पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून गावातील तरुण कार्यकर्ते, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, युवक मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येवून या घटनेचा निषेध करून या घटनेच्या निषेधार्थ कडोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वांनी आपापली दुकाने, संस्था बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला.









